पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर अनेक नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आणखी काही तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना शरद पवारांनी मोठा धक्का दिला.
अजित पवारांच्या विश्वासातील ४ माजी नगरसेवकांनी गेल्या महिन्याच्या २५ तारखेला पक्षाला इशारा देत बंडाची भाषा केली होती. भाजपचा आमदार असलेला चिंचवड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेत नवीन उमेदवार द्या नाही तर तुतारी फुंकू, असा इशारा नगरसेवकांनी दिला होता. या बंडानंतर ४ दिवसात पक्षाच्या शहरातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही बंडाचा इशारा दिला. दोन्ही बंडामागचा उद्देश भलताच असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
चिंचवडमध्ये नवा चेहरा द्यावा, अन्यथा तुतारी फुंकू, असा इशारा देत ‘या बंडामध्ये आपल्या पक्षासह भाजपच्या देखील काही नाराज माजी नगरसेवकांची साथ आहे’, असा दावा ४ माजी नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे आता आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या पक्ष सोडून जाण्याने अजित पवारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चिंचवडमधील दोन बंडांचे अजित पवारांसह भाजपचे देखील टेन्शन वाढले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मताधिक्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे मित्रपक्षातील हे बंड शमले नाही तर भाजपला तेथे फटका बसण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुनील तटकरेंना मुंबईहून रायगडला नेणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचा मृत्यू
-कसब्यात ‘पोस्टरवॉर’! रासने समर्थक लागले कामाला; ‘तैयार है हम’चा दिला नारा
-पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा
-भाजपचं ठरलं! ४ मतदारसंघात विद्यमानांना पसंती, पण कॅन्टोन्मेंट अन् कसब्याचं काय?