Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या सर्वांची लाडकी रिंकू राजगुरु ‘सैराट’ मराठी चित्रपटातून करिअरला सुरवात केली आहे. रिंकू राजगुरू सैराट चित्रपटाने चांगलीच फेमस झाली आहे. रिंकू राजगुरु ‘सैराट’नंतर ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’, ‘झुंड’ आणि ‘झिम्मा २’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. रिंकू लवकरच सुबोध भावेबरोबर एका नव्या चित्रपटातून नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रिंकू राजगुरूने गुढीपाडव्याच्या दिवशी सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. रिंकूने चैत्र पाडव्याच्या दिवशी छान मराठ मोळा लूक केला होता. रिंकूने लाल कलरची साडी नेसली असून अत्यत साधा मेकअप केला आहे. रिंकूने हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.
View this post on Instagram
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या फोटो पोस्टसह रिंकूने आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या पारंपारिक लूकमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे रिंकू राजगुरू पुन्हा चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Skin Care Tips: वाढत्या उन्हामुळे त्वचेवर टॅनिग झालंय! करा ‘हे’ घरगुती उपाय
-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा
-पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले