पुणे : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडून राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह अनेक विविध योजना जाहीर करण्यात आल्या. या योजनांचा राज्यातील नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी कोट्यावधींचा खर्च करुन जाहिराती करण्यात येत आहेत. राज्य सराकराची सर्वात चर्चेत असणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ या योजनेच्या जाहिरातीसाठी महिलांचा फोटो वापरण्यात आला. यावरुन आता एका महिलेने बॅनरवरील फोटोवरुन भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे बॅनर लावले. या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांसमवेत स्वत:चा फोटो छापला आहे. ‘नात्याचा मान, माय-भगिनीचा सन्मान’ असे शिर्षकही देण्यात आले आहे. पण या बॅनरवर आणखी दोन महिलांचे फोटो छापले ते विनासंमती छापल्याचा दावा आता एका महिलेने केला आहे.
शिवाजीनगर मतदारसंघामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरमुळे माझ्या कुटुंबामध्ये वाद सुरु आहे. गैरसमज व त्रास झाला आहे. अयोग्य चुकीचे मनमर्जी, बोगस काम केलेले सिद्धार्थ शिरोळे यांच्याबद्दल ही लेखी तक्रार देत आहे, असे या महिलेने दिलेल्या तक्रार अर्जामध्ये सांगितले आहे. या प्रकरणी आता गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना याची चौकशी करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार शरद पवारांसोबत जाणार?; कार्यकर्ते म्हणाले, ‘दादांना पक्षात घेतले तर…’