पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. खून, बलात्कार, गुंडगिरी फसवणूक, लैंगिक छळ यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना शहरात रोज घडतच आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या विश्राम बाग पोलीस स्टेशन समोर वाहतूक नियंत्रण ड्युटीवर कार्यरत असलेल्या महिला अधिकारीने मध्यप्राशन केलेल्या आरोपीला हटकलं आणि कारवाई करताना आरोपीने थेट महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंतपणे जाळण्याचा भयानक प्रयन्त केला आहे. या प्रकारावरुन कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना देखील संरक्षण द्यायची गरज आहे की काय? असा प्रश्न पडत आहे.
आरोपीने महिला पोलीस अधिकारीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर उपस्थित इतर पोलीस अधिकारी आणि स्थानिकांनी आरोपीला पकडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलीस हद्दीतील ही घटना ६ च्या सुमारास घडली आहे.
संजय फकीरबा साळवे( वय ३२ वर्षे रा. पिंपरी चिंचवड मुळ रा. पिंपळगाव शेला हो जवखेडा बुद्रुक जिल्हा जालना) असे आरोपीच नाव आणि ओळख आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्व्यवर असलेल्या पोलीस हवालदार समीर प्रकाश सावंत आणि पोलीस महिला अधिकारी जाणकार मॅडम हे आपली ड्युटी करत होते.
दरम्यान मध्यप्रशन करून चारचाकी चालवणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश असताना रात्री ८ च्या सुमारास आरोपी संजय फकिरबा साळवे, हा दारू पिऊन चारचाकी चालवनताना अढळला. म्हणून त्याच्या वर कायदेशीर कारवाई करणे अनिवार्य असताना, कारवाई होऊ नये म्हणून आरोपीने पोलिसांच्या हातातली मशीन ओडून गाडीतील पेट्रोल महिला अधिकारी व फिर्यादी यांच्या अंगावर ओतण्याचा प्रयन्त केला. आणि खिशात असलेल्या लायटरने फिर्यादी आणि महिला अधिकरला जाळण्याचा प्रयन्त केला. यादरम्यान आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आता सर्वांना वारीच्या पालखीत फिरायचंय, पण…’; अजित पवारांचा शरद पवारांना टोला
-‘दादांवर मोदी, फडणवीसांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्यामुळे…’; सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला
-विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; छोटा राजनच्या नावाने धमकावणं पडलं महागात, नेमका काय प्रकार?
-अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपावर अजित पवारांचं सणसणीत उत्तर; म्हणाले, ‘मी स्पष्टच सांगतो…’
-पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच घेतला बळी, निघाला कोयता गँगचा मेंबर