पुणे : पुणे मेट्रो स्कानकावर सोमवारी रात्री एक दुर्घटना घडली आहे. शहरातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मनोज कुमार (वय ४०) असे या या प्रवाशाचे नाव असून हा सायंकाळी ६.३० वाजता स्थानकावररील सरकत्या जिन्यावर जात असताना अचानक पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
तो अचानक जिन्यावर पडला. स्थानकातील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने त्या प्रवाशाला स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. तिथे कक्षातील डॉक्टर आणि परिचारिकेने या प्रवाशावर तातडीने प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच मनोज कुमार या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत.
पुणे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. या प्रवाशाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या शवविच्छेदनात मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
महत्वाच्या बातम्या-
-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…
-Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ; एका दिवसांत किती लाख रुपयांची कमाई?
-विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ
-पुणेकरांनो सावधान! आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण; रुग्णसंख्या ६ वर पोहचली
-भुशी डॅम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; पर्यटकांना संध्याकाळी संचारबंदी