पुणे : देशभरासह महाराष्ट्रात देखील लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुती उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ यांना पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा देऊ केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार हे बारामती मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले आहेत. यामध्ये पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा सामना पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एका बाजूला संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले असताना अजित पवार तसेच त्यांचे दोन्ही पुत्र हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार व योगेंद्र पवार यांना धमकावले जात असल्याची तक्रार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी ही मागणी केली असताना प्रशासनाने मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचं पाहायला मिळाले.
एका बाजूला रोहित पवार व योगेंद्र पवार यांना सुरक्षेची मागणी असताना दुसरीकडे कोणतीही मागणी न करता पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देऊ करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जाणकारांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हॉट फोटोशूट: प्राजक्ता माळीने शेअर केले दिलखेचक फोटोज; चाहत्यांनी पाडला लाईक्स, कमेंटचा पाऊस
-“वंदे मातरम्! Best Lucky आजोबा…” शहीद जवानाच्या चिमुकल्याच्या शुभेच्छा; आढळराव पाटील गहिवरले
-‘ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती’; १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा