पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी शिरुर येथील कार्यक्रमात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना आढळराव पाटीलांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना संसदरत्न पुरस्कारांच्या विश्वासर्हतेवरच शंका उपस्थित केली आहे.
‘लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळणारा संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरीचा प्रकार आहे. या पुरस्कारांचा सरकारशी कोणताही संबंध नसतो. चेन्नईत बसून संसदरत्न पुरस्कार वाटले जातात. मलाही २ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. पण मी तिसऱ्यांदा हा पुरस्कार घेतला नाही. आमचे श्रीरंग बारणे यांना ८ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, यावरुन ओळखा हा संसदरत्न पुरस्कार काय आहे? अमोल कोल्हे हे संसदरत्न पुरस्कार घेऊन टेऱ्या बडवत आहेत’, अशा शब्दात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.
“मला फेकाफेकी करता येत नाही. मी हाडाचा राजकारणी नाही. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझा राजकीय प्रवास आणि इतिहास तुम्हाला माहितीच आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवुनी फक्त लढ म्हणा या उक्तीप्रमाणे मी अमोल कोल्हे यांनी पराभव केल्यानंतर ही विकास कामं करत राहिलो”, असे आढळराव पाटील यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरने नकळत दिली प्रेमाची कबुली; ‘त्या’ फोटो पोस्टमुळे चर्चा
-‘ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक, जनता मोदींचे हात नक्कीच बळकट करेल’- मुरलीधर मोहोळ
-Lok Sabha Election | अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यात महत्वाची बैठक