Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने कांस्यपदक पटकावत आपले खाते खोलले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावत मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकर ही या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
०.१ ने मनु भाकरचे रौप्यपदक हुकले त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतासाठी पदकांचे खाते उघडणारी मनू भाकरला मागील वेळी पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने पदक जिंकता आले नाही. मात्र, यावेळी तिने हार न मानता यंदा ऑलिम्पिक पदकावर आपले नाव कोरले आहे.
मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केले होते. १० मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटल्यामुळे २०२०मध्ये मनूला पदकापर्यंत पोहचू शकली नाही. भारताच्या २१ नेमबाज सदस्यांमध्ये मनू भाकर ही एकमेव अशी अॅथलीट आहे जी अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने कांस्यपदक पटकावून भारतीयांचे मन जिंकले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…
-Pune Rain: काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस; पुढील दोन दिवस शहराला ऑरेंज अलर्ट
-ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर