पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरवात केली. यावेळी उपस्थितांनी आबा बागुल यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सुरवातीपासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या आबा बागुल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी, त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस भवन येथूनच केली आहे.
आबा बागुल यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे बुधावरी सकाळी आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी ई-लर्निग स्कूल येथून या दुचाकी रॅलीला सुरवात झाली. या रॅलीत तरुणाई बरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी आबा बागुल ‘हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. दरम्यान पर्वती मतदारसंघातील काँग्रेसचे शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आबा तुम्ही घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. आम्ही आपल्या मागे खंबीरपणे उभे आहोत, तुमचा विजय निश्चित आहे, अशा भावना यावेळी आबा बागुल यांनी व्यक्त केल्या आहेत.
पर्वती मतदारसंघातील परिवर्तनासाठी या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, अशा भावना आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. तसेच ‘आपला विजय निश्चित आहे. आपण काँग्रेसचे विचार जे महात्मा गांधी यांनी दिले ते कायम पुढे ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे’, असे आबा बागुल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: पुण्यातील २१ मतदारसंघातील लढती, फक्त एका क्लिकवर..
-‘मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार”; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा
-‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’
-“मी साहेबांना दैवत मानलं, तरीही…”; शरद पवारांनी केलेल्या नकलेवर अजितदादांची प्रतिक्रिया
-आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया