पंढरपूर | पुणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या पंढरीत स्वच्छता राखण्यासाठी व लक्षावधी भाविकांना कोणत्याही रोगराईला सामोरे जावे लागू नये, यासाठी भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) ४०० स्वच्छतादूत सज्ज झाले आहेत. रविवारपासून पंढरीत स्वच्छता राखण्याचे काम करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
पंंढरपूर नगरीमध्ये वारकरी भाविक दर्शनासाठी आले असताना त्यांच्याकडून स्वच्छता राखली जावी, भाविकांना कोणत्याही अस्वच्छेतेचा सामना करावा लागू नये, यासाठी बीव्हीजीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी ‘बीव्हीजी’चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरुन बीव्हीजीने पंढरपूरमध्ये चांगलेच काम सुरु केले आहे.
बीव्हीजीने जवळपास ४०० स्वच्छतादूत अत्याधुनिक साहित्यासह पंढरपूरला रवाना केले आहेत. या स्वच्छतादूतांमार्फत ‘बीव्हीजी’ची विठूरायाचरणी स्वच्छतासेवा अर्पण करण्यात येत आहे. गतसाली देखील बीव्हीजीच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी स्वच्छता सेवा अर्पण करण्यात आली होती. ‘वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेली पंढरी स्वच्छ करण्याची संधी आमच्या ‘बीव्हीजी’ला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार आमचे ४०० स्वच्छतादूत अत्याधुनिक साहित्यासह पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांना स्वच्छ व निरोगी वारी अनुभवता यावी, यासाठी हे स्वच्छतादूत अहोरात्र कार्यरत आहेत. सदर सेवेचा कोणताही मोबदला न घेता ‘बीव्हीजी’तर्फे ही सेवा देण्यात येत आहे,’ अशी प्रतिक्रिया हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
‘स्वच्छता क्षेत्रात काम करणारी ‘बीव्हीजी’ ही देशातील प्रथम क्रमांकाची संस्था आहे. पंढरपूर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘बीव्हीजी’ने पुढाकार घेतल्याने सरकारी यंत्रणेवरचा आणि मनुष्यबळावरील ताण निश्चितच कमी होणार आहे. टॉयलेट स्वच्छतेसाठी बीव्हीजीच्या वतीने बायोकल्चर नावाची पावडर वापरण्यात येणार आहे. बायोकल्चरच्या वापराने स्वच्छता गृहात दुर्गंधी पसरत नाही.
महत्वाच्या बातम्या-
-ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या ‘या’ प्रमुख ६ मागण्या
-एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट
-बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?
-पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!