पुणे : महायुतीचे शिरुर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी भोसरीच्या गावजत्रा मैदानावर प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे यांसह इतर नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही निशाणा साधला.
काँग्रेस पक्षाचे सरकार होते, तेव्हा महाराष्ट्रासह देशात बॉम्बस्फोट व्हायचे. गेल्या १० वर्षांत कोणी बॉम्बस्फोट करण्याची हिम्मत केली नाही. पाकिस्तानला माहीत आहे त्यांचा बाप दिल्लीत बसला आहे. त्यामुळे भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानची झाली नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
“जगातील १०० देश म्हणतात कोविड काळात आम्ही नरेंद्र मोदींमुळेच जिवंत आहोत. म्हणजे आपले मोदी भारतात नव्हे तर १०० देशांचे नेते आहेत. इंडिया आघाडीला ५ वर्षांत पंतप्रधान निवडता आला नाही. ही काय घराणेशाही नाही? फॅक्टरी नाही. इंडिया आघाडीकडे नियत आणि नीती नाही. प्रत्येक नेता स्वतःच्या घरातील व्यक्तीला मोठं करण्यात व्यस्त आहे”, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“पाच वर्षांपूर्वी पण अभिनय सोडतो म्हंटले पण…”; अमोल कोल्हेंच्या चुनावी जुमल्यावर आढळराव बरसले
-‘शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने शाश्वत उर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर’- मुरलीधर मोहोळ
-भर पावसात अजित पवारांचा रोड शो; म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय, त्यामुळे…”
-“भविष्यात लढेल की नाही माहीत नाही….” आढळराव पाटील झाले भावूक
-‘तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे’; केतकी चितळे ठाकरेंवर का भडकली?