पुणे : महिलांचा श्रावणमासातील उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणजे ‘मंगळागौरी’. काळानुसार पारंपारिक सणोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत. आधुनिक युगाशी स्पर्धा करताना शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि सण-उत्सव साजरा करण्यासाठी अनेकदा मर्यादा येतात. मात्र, महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले, तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळातो. याचा प्रयत्य भोसरी विधानसभेतील ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’ या कार्यक्रमात येत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता प्रोत्साहन या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘इंद्रायणी थडी’ भरवणाऱ्या शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या पुढाकाराने ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’ हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केला आहे. प्रतिवर्षी आम्ही श्रावणमास आणि मंगळागौरी सणानिमित्त विविध कार्यक्रम घेत असतो. यावर्षी प्रसिद्ध सादरकर्ते आकाश फल्ले आणि रमेश परळीकर यांच्या सूत्रसंचालाने कार्यक्रमांची रंगत वाढलेली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात येत आहे, असे पूजा लांडगे म्हणाल्या आहेत.
विशेष म्हणजे, भोसरी विधानसभा मतदार संघातील भोसरी, डुडुळगाव, मोशी, दिघी, तळवडे, चऱ्होली, वडमुखवाडी, चिखली, इंद्रायणीनगर, संतनगर, पूर्णानगर, शरदनगर, स्पाईन रोड, नेहरुनगर, मासुळकर कॉलनी, देहु-आळंदी रोड, हुतात्मा चौक, भोसरी, जाधववाडी, चिखली अशा विविध २५ ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमांमध्ये विजेत्या महिलांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज, द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी पिठाची गिरणी, चतुर्थ क्रमांसाठी मायक्रो ओव्हन, पाचव्या क्रमांसाठी मिक्सर अशी बक्षीसे दिली जात आहेत. त्या-त्या परिसरातील महिलांचा या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद
-‘मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा’, खड्डानाथ, खड्डादादा अन् खड्डेंद्र…; पुण्यात काँग्रेसची बॅनरबाजी
-विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला
-‘मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी सगळा पक्षच…’; अजित पवार असं का म्हणाले?