नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात दोन राज्यांचा उल्लेख केंद्रीय अर्थसंकल्पात झाला याचा अर्थ इतर राज्यांना काहीच मिळाले नाही. महाराष्ट्रासाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्राला काही मिळाले नाही, हा खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा उद्देश आहे. पण या भूलथांपांना कोणीही बळी पडणार नाही, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना फटकारले.
खोटं ‘नॅरेटिव्ह सेट’ करणे हाच विरोधकांचा उद्देश असे सांगून मोहोळ म्हणाले, पुण्यासह राज्याला केंद्राकडून भरगोस निधी मिळाला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, ग्रामीण रस्ते सुधार, इकॅानॉमिक कॉरिडॉर, पर्यावरण कृषी प्रकल्प राज्याला मिळाले आहेत. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, मुंबई-पुणे, नागपूर मेट्रो, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, एमएमआर ग्रीन मोबॅलिटी, पुणे आणि नागपूर नद्यांसाठी तरतूद अशा विविध बाबी महाराष्ट्राला मिळाल्या आहेत.
मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला १० लाख ०५ हजार रुपयांचा निधी मिळाला असून यंदाच्य रेल्वेच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला १५ हजार ५०० कोटी मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा निधी कॉंग्रेस सरकारच्या १३ पट अधिक आहे, असे सांगून मंत्री मोहोळ यांनी विरोधकांच्या दाव्याची पोलखोल केली.
महत्वाच्या बातम्या-
-वादग्रस्त पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं? चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
-घालीन लोटांगण, वंदीन बिहार, म्हणत अर्थसंकल्पावरुन अमोल कोल्हेंचा भाजपला खोचक टोला
-अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात काय झाले स्वस्त?
-ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; डॉक्टरांनीच रुग्णांना…