पुणे : पुणे शहरात जवळपास ८०० किलो ड्रग्ज साठा पुणे पोलिसांनी जप्त केल्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडले. त्यातच शिक्रापूरमध्ये अफूची शेती केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. आता सासवडमध्ये देखील अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासवड परिसरातील कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी १० किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी दशरथ सीताराम बडदे (वय ६५), तानाजी निवृत्ती बडदे (वय ६९, रा. कोडित, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांकडून १० किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून, जप्त केलेल्या अफूच्या बोंडाची किंमत २१ हजार रुपये आहे. पुरंदर तालुक्यातील कोडित गावात कांदा शेतीत बडदे यांनी अफूची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा अफूची लागवड न दिसण्यासाठी बडदे यांनी कांदा आणि शेवंतीच्या फुलांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक राहुल गावडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडू वीरकर, सूरज नांगरे यांनी ही कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“जबाबदारीच्या पदावर बसलेली लोक पोरकट बोलतात”; शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं
-“जरांगेंना शरद पवार, रोहित पवारांकडून मदत मिळते, त्यांचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे”
-पुण्यात बनवल्या जात होत्या बनावट नोटा; पोलिसांनी ६ जणांना केलं जेरबंद
-यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पुणे जिल्हयाला काय काय मिळालं? वाचा एका क्लिकवर
-वसंत मोरेंच्या मनात नेमकं काय? सुप्रिया सुळेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण