चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. चिंचवड विधानसभेववरुन भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाने देखील चिंचवड विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी शंकर जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप या दीर-भावजईमध्ये वाद सुरु आहे. जगताप कुटुंबात सुरु असलेल्या वादाचा फायदा घेत शरद पवार गटाकडून आमदार अश्विनी जगताप यांना शरद पवार गटाची दारे खुली असल्याची ऑफर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे.
पिंपरी आणि चिंचवड विधानसभा या दोन्ही जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद असल्यामुळे शरद पवार गटाच्या तुषार कामठे यांनी चिंचवडच्या जागेवर दावा केला आहे. पिंपरी, चिंचवड विधानसभा ही तुतारी चिन्हावरच लढवली जाणार आहे. तुषार कामठे यांनी जगताप कुटुंबाबाबत बोलताना ‘अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांसाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली असतील’, असे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल
-अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला
-महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; नेमकं कारण काय?
-रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; तपासात धक्कादायक माहिती