पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठांबरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यांनी दिलेल्या ऑफरवर आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकांना वाटतं की माझ्यासारखी काम करणारी महिला त्यांच्याबरोबर असावी. हे माझे भाग्य आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. काम करणारी महिला त्यांच्याबरबर असावी हे त्यांनी खुलेपणाने आणि मोठेपणाने त्या व्यक्त झाल्या. यासाठी मी आभारी आहे’, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.
“सध्या मी ती ऑफर स्वीकारली नाही. कारण, मी अजितदादांबरोबर असून त्यांच्या नेतृत्त्वार पूर्ण विश्वास आहे. अजितदादा कधीही कार्यकर्त्याला अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडत नाहीत, हा मला चांगलाच अनुभव आहे. मला राष्ट्रवादीत दोनच वर्षे झाली आहेत. त्यामुळे अजित दादांच्या नेतृत्त्वावर मी शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही. अजित दादा सक्षम महिलांना न्याय नक्कीच देतील”, असेही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार?
रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ… @Rupalispeak@ShivSenaUBT_ pic.twitter.com/lQkv4duHkh— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 13, 2024
“मी काम करणारी कार्यकर्ता आहे. योग्यवेळ यावी लागते. धरसोडपणा करून मीच सर्वस्व आहे, असे समजून योग्य ठरणार नाही. पण माझी वेळ अजित दादा नक्कीच आणतील. आता ऑफर स्वीकारली नाही, पण भविष्यात स्वीकारणार का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “भविष्य सांगणारी मी नाही. ज्यावेळी त्या घडामोडी होतील त्यावेळी सांगितले जाईल”, असं रुपाली ठोंबरे विश्वासाने म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-जगताप दीर भावजईच्या वादात भाजपच्या निष्ठावंताने घेतली उडी; केला ‘हा’ गंभीर आरोप
-खासदार निलेश लंकेंची कुख्यात गँगस्टरसोबत भेट, राजकीय वर्तुळात खळबळ
-राजकारणात बारामतीच श्रीमंत; एकट्या पवार कुटुंबात इतकी पदे
-महायुतीत तिढा; पुण्यातील ‘या’ २ जागांवर अजित पवार गटाचा दावा, भाजपची काय भूमिका असणार?
-“पोलिसांच्या दुर्लक्षावर पुन्हा शिक्कामोर्तब…” गंगाधाम चौक अपघातानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक