पुणे : पुणे शहरात अनेक रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. यावरुन सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करवा लागतो. रस्त्यांवर या खड्ड्यांना बुजविले जात नसल्याने पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर पथ विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे या उत्सवाला शहरात मोठी गर्दी होत असते. अशातच अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याची तक्रार अनेक नागरिक आणि वाहन चालकांकडून केली जात होती. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिका आयुक्तांना भेटून निवेदने देण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत पथ विभागाने खड्डे दुरुस्तीस सुरुवात केली असून ९ दिवसात ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजविले असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, २ हजार ७९५ टन गरम डांबर वापर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीत आबा बागुलांनी ठोकला शड्डू, कार्यकर्तेही लागले कामाला; बॅनर्स झळकवत….
-भक्तांच्या ‘त्या’ मागणीचा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने राखला मान, काय होती मागणी?
-अमोल कोल्हेंनी लोकसभेत केली बिबट्याच्या नसबंदीची मागणी; मनेका गांधी म्हणाल्या, ‘त्यापेक्षा..’
-‘देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण…’; जरांगे पाटलांचं वक्तव्य