पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. शहरात महिला अत्याचार, हत्या, कोयता हल्ला, चोरी, गोळीबार असे गुन्हे दररोज घडत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांना म्हणावं तसं यशही येताना दिसत नाही. मात्र आता गुन्हेगारांना वचक बसणारा निर्णय लागू झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी पुणे पोलीस दलात मोठा बदल झाला आहे.
आजपासून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने ७ पोलीस ठाणी सुरु झाली आहेत. शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या पोलीस ठाण्यांचे उद्घाटन केले. त्यानंतर शनिवारी सातही ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे शहरामध्ये नव्याने सुरु झालेली पोलीस ठाणी कोणती आणि पोलीस निरिक्षक म्हणून कोणाची कोणत्या पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. हे पुढीलप्रमाणे- शरद झीने आंबेगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर, अतुल भोस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड सिटी, महेश बोलकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर, संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी, पंडित रजेतवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली, मंगल मोढवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी, मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ अशी नवीन ठाणी आणि पोलीस निरिक्षक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कलह; हर्षवर्धन पाटलांवर टीकेची झोड, अन् बंडखोरीचा इशारा
-बोपदेव घाट प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अद्याप अटक नाही