पुणे : फायरब्रँड नेते म्हणून पुण्यातील राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असणारे वसंत मोरे यांनी काल अखेर मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. आपल्यावर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने अन्याय केला जात असून मी मोठा होत असल्याने दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे. मनसे कार्यालयात राज ठाकरे यांच्या फोटोपुढे अखेरचा दंडवत म्हणत मोरे यांनी आपण मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देताच इतर पक्षांकडून त्यांना प्रवेशासाठी खुली ऑफर दिली आज असतानाच काँग्रेसचा बडा नेता मोरे यांच्या भेटीला पोहचला आहे.
काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी आमदार असणारे मोहन जोशी हे आज सकाळीच वसंत मोरे यांच्या भेटीला पोहचले असून दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पुढे आलेलं नाही. मनसे सोडल्यानंतर मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा सुरू असतानाच या भेटीमुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
जिथे फुले वेचली तिथं काटे वेचायला जाणार नाही?
“गेली दोन वर्षांपासून मी लोकसभा लढवण्याची तयारी करतोय, परंतु अलीकडच्या काळात जे लोक इच्छुक नव्हते त्यांची नावे पुढे वाढत गेली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचा निगेटिव्ह अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवला गेला. मनसे पुणे लोकसभा लढवू शकत नाही, हे अहवालात सागितलं गेलं. वसंत मोरेने निवडणूक लढवू नये म्हणून निगेटिव्ह अहवाल पाठवला गेला. राज ठाकरे यांची गेल्या महिन्यात वेळ मागितली होती, परंतु तेही काही बोलले नाहीत. असे राजकारण होणार असेल तर पक्षात रहाण्यात अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर दिली होती. दरम्यान, जिथे फुले वेचली तिथं काटे वेचायला जाणार नाही? परतीचे सर्व दोर मी कापले आहेत” असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; ‘या’ पक्षात प्रवेश करणार
-ईडीच्या १८ वर्षांतील कारवायांचा शरद पवारांनी वाचला पाढा; रोहित पवारांवर केलेल्या कारवाईवरून आक्रमक
-महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचं वक्तव्य; ‘जागावाटपाची प्राथमिक चर्चा झालीय तिन्ही पक्ष…’
-दिल्ली दरबारी महायुतीची महत्वाची बैठक; लोकसभेसाठी महायुतीकडून पुण्यात ‘या’ नावाला पसंती
-पुणे मेट्रो धावणार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत, विस्तारीत मार्गाला मान्यता