पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. काही नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. तर काही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं दिसत आहे.
कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पटलं नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत. गुरुवारी सावंत यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन महायुतीमध्ये संतापाची भावना आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तानाजी सावंत हे महायुतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आजही त्यांनी धाराशिव लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या पराभवावर भाष्य केले आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या, अशी विनंती अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कॅन्टोन्मेंटमध्ये बदलाचे वारे! कुरघोडीच्या राजकारणात बागवेंचा पत्ता कट? साळवेंना काँग्रेसचं बळ
-पुजा खेडकर प्रकरणी पुण्यातील वायसीएम रुग्णालयासह अधिष्ठताही अडचणीत; वाचा नेमका काय प्रकार?
-धक्कादायक! आईच्या प्रियकरानेच अल्पवयीन मुलीसोबत केलं ‘हे’ कृत्य; आईचं दुर्लक्ष, पण…
-पुणे विमानतळावरील प्रवास होणार अधिक सुखकर; मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ घोषणा
-काश्मीर खोऱ्यात यंदाही साजरा होणार गणेशोत्सव, पुणे शहरातील मंडळांचं सहकार्य