पुणे : बारामतीमधील एकाच कुटुंबामध्ये ५ जणांकडे पदे आहेत. पवार कुटुंबामध्ये ३ खासदार आणि १ उपमुख्यमंत्री, २ आमदार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबावर घराणेशाहीवरुन वारंवार टीका केली जाते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सणसणीत टीका केली आहे.
“राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर मलाही पद नव्हते. सुप्रिया सुळे यांना दीर्घकाळ पद दिले नव्हते. परंतु अजित पवार यांचा दुसऱ्यांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी घरात खासदारीक दिली. आता त्यांच्या पक्षातील नेते कुजबुज करत आहेत. ही घराणेशाही नाही. कारण शरद पवारांचे कुटुंब वेगळे आहे. अजित पवार यांचे कुटुंब वेगळे आहे. शरद पवार यांनी २०१४ पर्यंत काँग्रेसच्या सत्तेत सुप्रिया सुळे यांना खासदार केले नाही. त्यांना प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली होती. मात्र, अजित पवारांचा आपल्याच पक्षातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी घरातच पुन्हा खासदारकी दिली”, अशी टीका रोहित पवार यांनी अजित पवारांवर केली आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“अजित पवार यांच्या पक्षात अनेक गोष्टी सामान्य नाहीत. त्यांच्या पक्षातील अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशन होऊ दे, फंड मिळू दे, त्यानंतर अनेक आमदार निर्णय घेतील. आमच्याकडे येण्याची अनेकांची तयारी आहे. त्यातील ज्या लोकांनी खालच्या पातळीवर टीका केली नसेल आणि जे विरोधात फार बोलले नसतील त्यांच्याबाबत आम्ही विचार करु. इतरांना आमच्या पक्षात घेणार नाही. कोणाला पक्षात घ्यायच याचा निर्णय वरिष्ठ घेतील.”
महत्वाच्या बातम्या-
-मिलियन्समध्ये फॉलोवर्स असणारी X-mau मयुरी पवार गायब; पोलिसांकडून शोध सुरू
-लोकसभा पराभवानंतर RSS इन ॲक्शन मोड; ‘मोतीबागेत’ नेत्यांची परेड; नेमकं घडतंय काय?
-अजित पवार गटाचे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक; मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?
-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक; असा ठरला जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; आंब्यांच्या पेट्यांमधून विदेशी मद्य जप्त