बारामती : बारामती नगरपरिषदेतील नगर रचनाकार पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याला १ लाख रुपयांती लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. बुधवारी १९ मार्च सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. विकास किसनराव ढेकळे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून बारामती तालुका नगर परिषदमध्ये विकास ढेकळे हे नगर रचनाकार (टॉऊन प्लॉनर) आहेत. ढेकळे यांनी एका बांधकाम व्यवसायिकाकडे १ लाख रुपयांची मागणी केली आहे.
ढेकळे यांच्याविरोधात बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली असून याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकची फर्म असून फर्मद्वारे बारामती येथील रूई या ठिकाणी निर्मित विहार इमारतीच्या बी विंग १ या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपालिकेत दाखल केला आहे. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोकसेवक नगर रचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. त्यामध्ये २ लाखांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती एक लाख ७५ हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नंतर सापळा कारवाईत लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेताना पंचासमक्ष विकास ढेकळे यांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?
-सावधान! पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, उल्लंघन केल्यास…
-दत्ता गाडेच्या वकिलाचे खरंच अपहरण? ‘त्या’ सीसीटीव्ही फूटेजमधून धक्कादायक माहिती समोर
-मोठी दुर्घटना! पुण्यातील हिंजवडीत टेम्पोला आग; चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत