पुणे : राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात आरोपी कोणत्याही कायद्याला न घाबरता, कसलीही भीती न बाळगता महिलांवर अत्याचार करताना दिसत आहेत. महिलांवर होणाऱ्या या अत्याचारांची मालिका सुरु आहे. आता काहींनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांबाबत अश्लील असा मजकूर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ठाणे पोलिसांनी सनी पारखे आणि जग्ननाथ हाटे यांना अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील मजकूर लिहल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रुपाली चाकणकरांविषयी इन्स्टग्रामवर अश्लील मजकूर लिहणाऱ्या सुमारे ३५ जणांची यादी पुणे सायबर पोलिसांकडे देण्यात आली आहे.
चाकणकरांविषयी अश्लील कमेंट करणाऱ्या संशयित व्यक्तीची फेसबूक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेऊन पोलिसांनी संशयित वसंत रमेशराव खुळे (वय-34 रा. रहाटी, ता.जि. परभणी) याचा शोध घेतला असता आरोप रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! झिकाचा प्रादुर्भाव वाढतोय; आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर रग्णसंख्या किती?
-पर्वतीमध्ये आबा बागुलांना वाढता पाठिंबा; गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण
-Ganesh Festival: काश्मीरमधील बाप्पाला भव्य विसर्जन मिरवणुकीने भावपूर्ण निरोप
-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला पुणे दौऱ्यावर; ‘या’ मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन