पुणे : पुणे शहरामध्ये झिका व्हायरसचा संसर्ग हा झपाट्याने वाढत आहे. याबाबत पुणे महापालिका प्रशासनाने दखल घेत प्रतिबंघनात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये आणि पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिबंधात्मक औषध फवारणी आणि जनजागृती करणेबाबत पालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे.
सध्या पुणे शहरात सर्वत्र झिका या रोगाचा संसर्ग सुरू झालेला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने याची दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेतच परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये या झिका वायरसवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषध फवारणी व झिका बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे श्रीनाथ भिमाले यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.
माझी या निवेदनाद्वारे आपणास विनंती आहे की, पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये झिका चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक औषध फवारणी व जनजागृती करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आपण सूचित करावे. तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिका या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर करावयाच्या औषध उपचाराबाबत सर्व वैद्यकीय सुविधा व औषध उपचारासाठी आवश्यक त्या बाबींची देखील उपलब्धता असावी याबाबत आपण आरोग्य विभागास सूचना द्याव्यात, हि नम्र विनंती, असेही श्रीनाथ भिमाले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांनी जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण योजने’वर दादांच्या लाडक्या बहिणीची टीका
-‘विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या…’; अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल
-वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? आज मोरेंचा मोर्चा ‘मातोश्री’वर