पुणे : मोठ मोठ्या शहरापासून ते ग्रामिण भागापर्यंत मुख्य चौकांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी तृतीयपंथीय आणि भिक्षेकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता पुणे शहारातील प्रमुख चौकांमध्ये वाहन चालकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय आणि भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. अशा लोकांनी धमकावून पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्या तर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
तृतीयपंथीय किंवा भिक्षेकरी हे खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पैसे मागताना आपण अनेकदा पाहतो. पण अशा लोकांना पैसे नाही दिले तर हे लोक धमकावून पैसे मागतात. शहरातील मुख्य चौकात अडवून पैसे मागतात. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागता. पैसे न दिल्यास हे लोक कारच्या काचा वाजवितात. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.
शहरातील प्रमुख चौक, खासगी कार्यक्रमात शिरून पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारपासून (१२ एप्रिल) लागू करण्यात येणार आहे. याबाबत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना धमकावून कोणी पैसे मागत असल्याच्या तक्रारी आल्यास तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणी, बेकायदा जमाव, नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करणे अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना
-“त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते तुमचा काय विकास करणार?”; अजित पवारांचा खोचक सवाल