पुणे : पुणे शहराच्या प्रत्येक टोकापर्यंत जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ची सेवा नागिरकांना देण्यात आली आहे. शहरात अनेक मार्गांवर ही सेवा दिली जात होती. पण काही भागांमध्ये पीएमपीएमएलच्या बस जात नव्हत्या. मात्र, शहरातील प्रवाश्यांची वाढती संख्या लक्षात घेता पीएमपीएमएल प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता शहरातील ६ मार्गांचा विस्तार केला असून या ६ भागात पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करता येणार आहे.
पीएमपीएमएल प्रशासनाकडून आता मोफत पास योजनाही सुरु करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शाळा सुरु होणार असल्यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पास दिली जाणार आहे. ५ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही मोफत पास देण्यात येणार आहे. तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना ७५ टक्के सबसिडीत पास दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.
शहरातील ‘या’ ६ मार्गांचा होणार विस्तार
दिघी ते भोसरी मार्गाचा विस्तार पिंपरी मेट्रो स्टेशनपर्यंत
नऱ्हेगाव ते स्वारगेट मार्गाचा विस्तार सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत
स्वारगेट ते नांदेडगाव मार्गाचा विस्तार बागेश्री सोसायटीपर्यंत
हडपसर ते वडकीगाव मार्गाचा विस्तार मस्तानी तलावापर्यंत
सेक्टर क्र.१२ ते भोसरी मार्गाचा विस्तार नाशिक फाटा मेट्रो स्टेशनपर्यंत
इंटरनिटी कंपनी (हिंजवडी) ते शिवाजी चौक या मार्गाचा विस्तार मुकाई चौकापर्यंत
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात आणखी एक भीषण अपघात; डंपरने महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू
-पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती मंदावते; काय खावे काय खाऊ नये?
-‘२ दिवस थांबा सगळं सरळ करु’; शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर शरद पवारांचे आश्वासन
-ट्रॅव्हल्समुळे हडपसरमध्ये वाहतूक कोंडी; आमदार तुपे उतरले रस्त्यावर