पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला. निवडणूक म्हटलं की एक्झिट पोल आलेच. मात्र यंदाच्या निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज म्हणजेच ओपेनिअन पोल आणि एक्झिट पोल दर्शवणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. देशात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २८ मार्च २०२४ रोजी अधिसूचना जारी करुन राज्यात १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत १ जून २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे, त्यांचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करणे, एक्झिट पोलचे निकाल जाहीर करणे यावर आयोगाकडून प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्या आधी ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. ४ राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणूका आणि १२ राज्यातील २५ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. याअनुषंगाने १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू?, पण आता मी बच्चा राहिलो नाही” -उदयनराजे भोसले
-“हडपसरमधून आढळराव पाटलांना ५० हजारांचा लीड देणार”- नाना भानगिरे