पुणे : पुणे शहरात गेल्या आठवड्यात सलग ४ गोळीबाराच्या घटना घटल्या आहेत. सिनेमांमधील दृषासारखे प्रकार पुणे शहरात घटताना दिसत आहे. शहरात झालेल्या गोळीबाराने पुणे शहर चांगलेच हादरले आहे. या गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली आहे. त्यातच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांना सज्जड इशारा दिला आहे.
“पुण्यात मुळशी पॅटर्न नव्हे तर ‘कायद्या’चा पॅटर्न चालणार”, असा इशारा अमितेश कुमार यांनी गुंडांना दिला आहे. गोळीबार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. महिनाभरात पोलिसांनी बेकायदा पिस्तुले बाळगल्याप्रकरणी २८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४२ पिस्तुले आणि ७४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत गुंडांना चांगलाच दम दिला आहे. पुण्यात फक्त कायद्याचा पॅटर्न चालणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते. गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न, तडीपार, मोक्का कायद्यान्वये कारवाईत जामीन मिळवलेल्या सराइत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुंड सामान्य नागरिकांना त्रास देत असतील तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी केले आहे. शहरातील बेकायदा धंद्यांवर कारवाई सुरु राहणार असल्याचे अमितेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एप्रिल महिन्यातही उष्णतेच्या लाटा कायम; पुढच्या ५ दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ
-‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेतील विकीचा नवा लूक पाहिला का?
-“मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ मला समजते, तुमच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन”
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी; वाकडमध्ये २७ लाखांची रोकड जप्त