पुणे : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे वेगवेगळ्या गोष्टींमुळे आता चर्चेत येत आहेत. नगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मेळावा लंकेने केलेले फोटोग्राफी चांगलीच गाजली होती. आता मात्र कुख्यात गँगस्टरच्या भेटीमुळे टीकेचे धनी झाले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणेची लंके यांनी पुण्यामध्ये भेट घेतली. या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी टीका होत आहे.
View this post on Instagram
निलेश लंके यांनी पुणे दौऱ्यावर असताना गजानन मारणे यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली. यावेळी मारणे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी निलेश लंके यांचा सत्कार केला. सत्कार आणि या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
लोकसभा निवडणुकीचे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणेची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून सरकारला तसेच अजित पवार गटाला टार्गेट करणारे आमदार रोहित पवार लंके – मारणे भेटीवर मात्र बोलताना दिसत नाहीयेत.
महत्वाच्या बातम्या-
-राजकारणात बारामतीच श्रीमंत; एकट्या पवार कुटुंबात इतकी पदे
-महायुतीत तिढा; पुण्यातील ‘या’ २ जागांवर अजित पवार गटाचा दावा, भाजपची काय भूमिका असणार?
-“पोलिसांच्या दुर्लक्षावर पुन्हा शिक्कामोर्तब…” गंगाधाम चौक अपघातानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक
-ससून रुग्णालयाचा आणखी एक अजब कारभार; उपचार केंद्र की लुटरुंचं केंद्र? नेमका काय प्रकार
-आता पुण्याच्या या भागातही करता येणार बसने प्रवास; वाचा पीएमपीएमएल प्रशासनाचा महत्वाचा निर्णय