पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडून जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदत मात्र लंकेच्या प्रवेशाबाबत काहीही माहीत नसल्याचे सांगितले.
एकीकडे पवारांनी निलेश लंके यांच्यावर बोलणं टाळलं, तर दुसरीकडे आमदार लंके यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेलं नसल्याचं दिसून येत आहे.
निलेश लंके यांनी अमोल कोल्हे यांची सोमवारी सकाळी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अमोल कोल्हे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र या भेटीनंतर कोल्हे यांनी, ‘निलेश लंके लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील’, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाविषयीचा सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत महायुतीत राडा; पवारांना पाडण्याचा नारा देत दिग्गज नेता मैदानात
-“निवडणुकीला उभं न राहण्याची ईडीकडून अप्रत्यक्ष धमकी”; शरद पवारांचा गंभीर आरोप
-“येत्या दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप ठरणार, ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही..”
-‘आम्ही भेटलो म्हणजे आमचं मनोमिलन नाही’; कट्टर विरोधक दिलीप मोहितेंची आढळरावांवर नाराजी कायम
-“कार्ट्यांना नीट सांभाळा…आता कोयता गँगचा सुपडाच साफ करणारे”- अजित पवार