पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघतानंतर शहरातील नाईट लाईफ, पब, बार, हॉटेल्स रुफ टॉप हॉटेलवर कारवाई सत्र सुरु आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वारंवार कारवाया केल्या जात आहेत मात्र, तरी देखील शहरात अद्यापही काही हॉटेल्समध्ये पहाटोपर्यंत मध्यपार्टी आणि त्यातच ड्रग्ज तस्करी सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
डेक्कन परिसरातील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मध्य पार्टी रंगलेली होती. या पार्टीमध्ये काही तरुण स्वच्छतागृहात जाऊन ड्रग्स घेत होते. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार थांबलेले दिसत नाही.
एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमध्ये अनेक अल्पवयीन मुलांना देखील दारू देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व पब, बार, रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करीत त्यांना सील ठोकले होते. मात्र, त्यानंतर देखील मद्यपार्टी आणि ड्रग्ज पार्ट्या सुरू असल्यामुळे पोलीस नेमके करतायेत काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आरक्षणाचा तिढा सुटणार? ओमराजे निंबाळकरांनी सुचवला ‘हा’ मार्ग
-शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा