पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीची सर्व पक्षांकडून आणि नेत्यांकडून तयारी सुरु आहे. त्यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आता मोठी घोषणा केली आहे. पुढील म्हणजे २०२९ला होणारी लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवणार आहे, असे महादेव जानकर म्हणाले आहेत. जानकर यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून परभाव झाला होता.
परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचेही जानकर यांनी सांगितले. परभीणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर हे महायुतीकडून निवडणूक लढले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे होते. तर वंचित बहुजन आघाडूकडून हवामान अभ्यायासक पंजाबराव डख हे देखील निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत संजय जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने महादेव जानकर यांचा पराभव केला होता.
महादेव जानकर यांच्या विजयासाठी परभणी लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी सभा देखील घेतल्या होत्या. पण अखेर या मतदारसंघात महादेव जानकर यांचा पराभव झाला. दरम्यान, आता जानकरांनी पुढची निवडूख बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवण्याचे जाहीर केले आहे. बारामतीत ताकदीने लढून विजयी होणार असल्याचा विश्वास देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
-सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कॅचवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; ‘त्याने तो कॅच नसता घेतला तर….’
-विधानसभेची तयारी! ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट
-रिक्षा चालकांसाठी आमदार सिद्दार्थ शिरोळेंनी विधानसभेत केली ‘ही’ महत्वाची मागणी
-ऑन ड्युटी महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकलं पेट्रोल अन्… पुण्यात नेमकं चाललंय काय?