पुणे : लोणावळा येथे वर्षासहलीसाठी आलेल्या ६ते ६ पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवार असल्याने भुशी डॅम परिसरामध्ये पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शनिवार-रविवार लागून सुट्टी आल्याने मोठ्या संख्येने पर्यटक भुशी डॅमवर आले आहेत.
पर्यटनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील ५ सदस्य भुशी डॅम मध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे.
रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून त्याला ओळखलं जातं. हे पाणी भुशी धरणात येते, तिथं पाच जणांचं शोधकार्य सुरू आहे. यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने रेस्क्यू टीमला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. लोणावळा परिसरामध्ये सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी झाली असून लांबच लांब वाहनाच्या रांगा देखील लागलेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या; संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस
-रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ
-रोमांचक सामन्यात भारताचा थरारक विजय; धोनी नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जिंकला टी-20 कप
-पुण्यनगरीत आज ज्ञानेबा-तुकोबांच्या पालख्यांचे होणार मनोमिलन; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल
-‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका