पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आता मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीचा शपथविधी कधी होणार? असे प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये सत्तास्थापनेच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मध्यरात्री महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यात नव्या सरकारचा शपथविधी हा २६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून केला जाणार असल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागून आहेत. भाजपने मुख्यमंत्रिपदासह गृह आणि नगरविकास खात्यावर दावा केल्याची माहिती मिळत आहे. महायुती मित्रपक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून कोणतीही नाराजी नसल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एकनाथ शिंदे मन मोठं करून भाजपला मुख्यमंत्रिपद देतील; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-निवडणूक झाली तरीही काँग्रेसमधला वाद काही संपेना! काँग्रेस भवनात नेत्यांमध्ये नवा वाद
-‘पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच’; कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्रिपद माळ?
-पोर्शे कार प्रकरण: अपघात प्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर
-‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत’; हेमंत रासनेंनी व्यक्त केली इच्छा