पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेल्या मैदानी चाचणी स्थिगित करण्यात आली होती. मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
२९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान ही चाचणी होणार आहे. मैदानी चाचणी ९ ते २७ जुलै या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, संततधार पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली. ग्रामीण पोलिसांकडून मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ९ आणि १० जुलै रोजी होणारी चाचणी आता २९ जुलै रोजी होणार आहे. ११ जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी आता ३० जुलै रोजी होणार आहे. १२ जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी आता ३१ जुलै रोजी होणार आहे.
१३ जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी १ ऑगस्ट रोजी होणार असून १५ जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी २ ऑगस्ट रोजी तर २५ जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी आता ५ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवरांनी आपल्याला महाआयटी विभाग, मुंबईकडून देण्यात आलेले पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी ५ वाजता हजर रहावे’, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Rain: काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस; पुढील दोन दिवस शहराला ऑरेंज अलर्ट
-ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर