पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून पब, बार, डिस्को हे सुरु आहेत. त्यापैकी अनेक आस्थापनांना पोलीस प्राधिकरणांकडून आवश्यक परवाने मिळालेले नाहीत. “शहरातील सर्व पब्ज आणि डिस्को पैकी फक्त २३ पब आणि डिस्कोंना आवश्यक परवाने मिळाले आहेत, आणि त्यापैकी एक परवानगी रद्द देखील करण्यात आली आहे”, अशी अॅड. समीर शेख यांनी ही माहिती माहिती अधिकारात मागितली होती.
या पब, बार, डिस्कोमधील अनधिकृत धंदे कायमचे बंद करण्याची मागणी तसेच पुन्हा उघडण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी नागरिकांच्या वतीने अॅड. समीर शेख यांनी केली आहे. ‘शहरामध्ये अलिकडच्या काळात होत असलेली कारवाई हे एक चांगले पाऊल आहे, परंतु प्राधिकरणांनी वेळेवर कारवाई करणे आणि या अनधिकृत धंद्यांना कायद्याचे उल्लंघन करण्यापासून रोखणे आवश्यक आहे. सामान्य जनतेला त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे आणि यंत्रणा कायदा लागू करण्यात आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कटिबद्ध आहेत हे त्यांनी कृतिद्वारे दाखवून देणे गरजेचे आहे”, असे देखील अॅड. शेख म्हणाले आहेत.
दरम्यान, २३ अधिकृत पब आणि डिस्को यांची यादी दिली आहे. ज्यातील एक रद्द देखील झालेली आहे. असे असताना सार्वजनिक सुरक्षा कायम ठेवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या आस्थापनांच्या नियमासाठी अधिक कठोर प्रयत्नांची आणि इच्छाशक्तीची गरज असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे’, अशी माहीती पुणे पोलिसांनी माहिती अधिकारातून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; डॉक्टरला अन् मुलीला झिकाची लागण
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालिककडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट
-‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?