पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरु केली आहे. गेल्या २ दिवसांपासून राज्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले आहेत. या जमा झालेल्या पैशावर बँकांनीच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लाडकी बहिण योजने अंतर्गत राज्यातील महिलांना मिळणारे पैसे हे आमच्या बहिणींना ओवाळणी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यातच आता महिलांच्या खात्यावर आलेल्या पैशावर बँकांनी डल्ला मारल्याने राज्यातील महिलांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
आम्हा लाडक्या बहिणीला दिलेल्या ओवाळणीवर बँका अशा तऱ्हेने डल्ला मारत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याकडे लक्ष देणार का? असा सवाल अनेक महिलांनी उपस्थित केला आहे. बँक खात्यात आलेल्या पैशातून बँकेने वसुली केली. बँक खात्यात मिनिमम बॅलन्स चार्जेस, जीएसटी, एसएमएस चार्जेसच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातील हजारो महिलांच्या खात्यातून बँकांनी मोठी रक्कम कापल्याचा दावा केवा आहे.
बँक खात्यात आलेल्या पैशातून मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांकडून सुरू असलेली वसुली तातडीने थांबविण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने आदेश काढावे. बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली कापलेली रक्कम त्वरित महिलांच्या खात्यात वर्ग करावी आणि यापुढे अशी वसुली करू नये, अन्यथा अशा बँकांविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडी, इन्कम टॅक्सची कारवाई; पहाटेपासून कारवाई सुरु
-ऐन विधानसभेच्या तोंडावर अजितदादांच्या ‘या’ नेत्याने दिला डच्चू; ‘घड्याळा’ऐवजी हाती घेणार ‘मशाल’
-पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्वाची अपडेट; रक्ताचे नमुने बदल्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक
-मराठा आरक्षणाबाबतच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी काढली लायकी, नेमकं काय झालं?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीत राडा; जगदीश मुळीकांनी काढली अजित पवारांच्या आमदाराची पात्रता