पुणे : राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती होण्याची चर्चा सुरु आहेत तर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील एका पोस्टरची सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. ‘भाजप मंडल अध्यक्ष व्हायचं असले तर DNA काँग्रेसचा पाहिजे’, अशी अट ठेवत बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यभरात भाजप मंडल अध्यक्षपदाची निवड सुरु आहे. यासाठी पक्षांतर्गत निवडणुका सुरु आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जातात. हे पद खेचून घेण्यासाठी पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहेत. एकमेकांविरुद्ध कुरघोड्या रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये मंडळ अध्यक्ष नियुक्तीवरुन भाजपमध्ये गटबाजी उफाळल्याचे पहायला मिळाले आहे.
बॅनरवर शर्ती काय आहेत?
फोर्च्युनर गाडी आणि पैसे असेल तरच भाजप अध्यक्ष होता येईल.
दुध भेसळ घोटाळ्याचा गुन्हेगार पाहिजे.
बुथ प्रमुख व भाजप सदस्य न केलेला असला तरी चालेल.
DNA काँग्रेसचाच असला पाहिजे.
अध्यक्ष निवडीसाठी मुलाखत न दिलेला असला तीर चालेल
पैसे असले तर 45 वयाची अट शिथिल केली जाईल.
तो भाजप सदस्य नसला तरी चालेल.
अशा अटी व शर्तींसह ‘एक श्रीरामपूरकर’ असं म्हणत हे बॅनर झळकावण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?
-पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
-‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अॅडमिशन फिक्स करा
-वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…
-पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; हर्षवर्धन सपकाळांकडे आणखी एक राजीनामा