पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्व पक्षांनी निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. मात्र, या निवडणुसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच २ वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संपर्कात असलेल्या पिंपरी चिंचवडचे भाजपच्या माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी हाती मशाल घेतल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता भोसरी विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे.
भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एकंदरीत आमदार महेश लांडगे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटप झाले नसल्याने आता महेश लांडगे यांच्या विरोधात कोण आखाड्यात उतरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शहराध्यक्ष राहिलेल्या अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे नाव देखील भोसरी विधानसभेसाठी चर्चेत आहे. तसेच आता हाती मशाल घेतलेल्या रवी लांडगे यांनी देखील भोसरीच्या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवी लांडगे यांच्या पक्षप्रवेशावेळी भोसरी विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण गडी मैदानात उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या–
-बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक
-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’
-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न