पुणे : देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. राज्यातील हायहोल्टोज लढतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार या लढतमध्ये पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा १ लाखांपेक्षा जास्तीच्या लीडने विजय झाला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. यानंतर अजित पवार यांच्या सांगण्यावरुन सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारे, आपले सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण कुस्तीगीर परिषदेकडून पुढे करण्यात आले आहे. यावर आता युगेंद्र पवार आणि शरद पवार गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आपल्याला या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. ‘अध्यक्षपदावरून हटवण्याच्या बाबतीत मला अधिकृत अद्याप काही कळवण्यात आलेले नाही किंवा मला तसे काही पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये काहीतरी निर्णय झाल्याची माहिती आहे”, असेही युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार गटाच्या महत्वाच्या बैठकीला अनेक आमदारांची दांडी! शरद पवार गटात परतणार?
-…म्हणूनच आढळराव पाटलांना शिरुरमध्ये पराभव झाला? भोसरीमधून ९ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य तरीही हार
-अजित पवारांना एकच जागा; शरद पवार म्हणाले, ‘त्यांच्या राष्ट्रवादीचे भविष्य…’
-महाराष्ट्रात एनडीएला फटका का बसला? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘अजित पवार आमच्यासोबत…’