पुणे : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक असून सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांवरील सुनावणीककडे लक्ष लागून आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात महत्वाच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता गुडघ्याला बाशिंब बांधून बसलेल्यांना आता काही काळासाठी मुंडावळ्या सोडाव्या लागणार आहेत. २२ जानेवारी रोजी होणारी सुनावणी लांबणीवर पडून २५ फेब्रुवारी म्हणजे आज होणार होती. मात्र, आता ही सुनावणी येत्या ४ मार्च रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचं दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत दाखल याचिकेबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता होती. सरकार या निवडणुका होण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं जात होतं मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात असल्याने आता निवडणुकांसाठी इच्छुक असणाऱ्यांना पुन्हा एकदा थोडा धीर धरावा लागणार आहे.
प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण तसेच वेगवेगळ्या 20 ते 22 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर न्यायालयाने निर्णय दिला असता तर निवडणुकीचा मार्ग आजच मोकळा झाला असता. राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितीच्या निवडणुक गेली तीन वर्षांपासून रखडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-धनुष्यबाण हाती घेण्याआधी धंगेकरांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची ऑफर!
-राजाराम पुलावरील उड्डाणपूलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे’ नाव देण्याची मागणी
-माणुसकी सोडली, बापाचे ऋण विसरल्या; मुलींकडून मान खाली घालायला लावणारं कृत्य
-भल्या सकाळी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदेंच्या खास मिशनवरुन राज संतापले
-गजा मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण; मोहोळांनी पुण्यात पोहचताच घेतली भेट