पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मिळालेल्या अपयशानंतर अनेक स्तरातून या निवडणुकीबाबत भाष्य केले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून देखील या निवडणुकीचे विश्लेषण करण्यात आले. रतन शारदा यांनी ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकामध्ये याबाबत लेख लिहला आहे. या लेखामध्येही अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे म्हटले आहे.
संघ आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीतही अजित पवारांमुळे भाजपचं नुकसान झाले असल्याचे अनेक नेत्यांनी बोलून दाखवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएस आणि भाजपच्या बैठकीत अजित पवारांबाबत झालेल्या चर्चेला ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत बाब आहे. पण अजित पवारांना सोबत घेऊन त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. उलट नागरिकांमध्ये भाजपवरची जी काही नाराजी होती त्याचा अजित पवारांनाच फटका बसला असेल, असे म्हणणे योग्य ठरेल, असे रुपाली ठोंबरे पाटील स्पष्टपणे म्हणाल्या आहेत.
‘असो… ती चर्चा किंवा ती बैठक या सर्व आरएसएसच्या अंतर्गत बाबी आहेत. मला त्या चर्चेबाबत काही बोलायचे नाही. त्यांनी कोणती चर्चा करावी किंवा कोणती चर्चा करू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, अजित पवारांमुळे भाजपला फटका बसला याबाबत महायुतीत कसलीही चर्चा नाही, असे कोणीही कोणाबरोबर बोललेले नाही’, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
-अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी शरद पवारांचा ‘मास्टर’ प्लॅन; सलग ३ दिवस बारामती दौऱ्यावर
-रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा; घेतली अजित पवारांची भेट, म्हणाल्या, ‘दादा…’
-रोहित पवारांच्या ट्विटची महाराष्ट्र पोलीस विभागाने घेतली दखल; पोलीस भरतीबाबत ‘हा’ मोठा निर्णय