पुणे : पुणे पोलिसांनी शहरातील पब, बार रेस्टोरंट आणि हॉटेल्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि पुणे पोलिसांनी शहरात तसेच शहराबाहेरुन देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघकीस आणल्यानंतर पुणे पोलिसांसह राज्यभरातील पोलीस आणखी अलर्ट झाले आहेत.
पुण्यातील पब, बार आणि हॉटेल व्यवसायिकांची पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील पब, बार आणि सर्व प्रकारची हॉटेल्स पूर्वीप्रमाणे दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास इथून पुढे देखील परवानगी असणार आहे.
अनेकदा नियम लागू करुनही पब आणि बार मालकांकडून नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा पोलीस करत असतात आणि कारवाई केली जाते. पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्यानं व्यावसायावर परिणाम होत असल्याची पब आणि बार मालकांची तक्रार असते. यावर उपाय शोधण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी पब, बार आणि हॉटेल्स मालकांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये हुक्का बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘हॉटेल आणि पब मालकांनी नियमांचं पालन केल्यास पोलीस आतमध्ये येऊन कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला इथून पुढे पुण्यात बंदी असणार आहे’, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. शहरातील नाईट लाईफ ज्यांच्यावर अवलंबून असते ते पब, बार आणि रेस्टोरंट एकाचवेळी सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतात तर दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी या पब आणि बारवर पोलिसांची बारीक नजर असणं गरजेचं आहे.
पोलीस आयुक्त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा स्थानिक पोलिसांकडून होण्याऱ्या विनाकारण त्रासाला आळा बसेल, असं पब मालकांना वाटत आहे. मात्र रात्री दीड वाजेपर्यंत पब आणि रेस्टोरंट सुरु ठेवताना पब आणि रेस्टोरंट मालकांना नियमांचं पालनही करावं लागणार आहे.
काय असेल नियमावली?
- इथून पुढे कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी असणार आहे.
- रूफ टॉप हॉटेलमधील साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागणार आहे.
- परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिताना आढळल्यास दारू पिणार्यावर आणि हॉटेल मालक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- पोलिसांनी गरज असेल तरच बार आणि पबच्या आतमध्ये प्रवेश करावा अन्यथा व्यवसायायात अडथळे आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाने घेतली दखल; पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश
-..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”
-महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
-अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”
-पुण्यात गाडी तोडफोड सुरुच; येरवड्यात कोयता गँग नंतर आता कोंढव्यात दारूच्या नशेत ८ गाड्या फोडल्या