पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी आज (११ जानेवारी) या राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी या पदाचा पदभार स्विकारण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मग पदभार स्विकारला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जनतेने भरभरुन मते दिली आहेत. त्यातच मुरलीधर मोहोळ हे निवडून आल्यानंतर त्यांना लगेच केंद्रात मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपने सगळी ताकद मोहोळांच्या मागे उभी केल्याची चर्चा पुण्यात आवाजात सुरु झाली आहे.
आज नई दिल्ली में भारत सरकार के सहकारिता मंत्रालय के राज्यमंत्री के रूप में पदभार ग्रहण किया। पदभर ग्रहण करने से पेहेले सहकारिता मंत्री माननीय श्री अमित शाह जी कीं भेट की और मार्गदर्शन एवं आशीर्वाद लिए ।
देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी और सहकारिता मंत्री… pic.twitter.com/bLB2EJHVuN
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 11, 2024
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मात्र, राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यातच आता केंद्रातील भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वाहन चालकाकडून पैसे घ्याल तर होणार ‘ही’ मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा
-स्मार्ट सिटी म्हणून गाजावाज केला त्याचं काय?; पुण्याच्या परिस्थितीवरुन सुप्रिया सुळे सरकारवर आक्रमक
-‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव
-मोहोळांकडे सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्रालयाचा कार्यभार; गडकरी, गोयल, जाधवांकडे कोणते खाते?