पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री तसेच दमदार आमदार तानाजी सावंत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे. तानाजी सावंत यांना मंत्री असताना त्यांनी हट्टाने त्यांच्या सुरक्षेसाठी ४८ पोलीस कर्मचारी नियुक्त करुन घेतले होते. मात्र, ते आता मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे.
तानाजी सावंत यांना आता फक्त एकच सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. मंत्री असल्याने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ज्यामध्ये चार कर्मचारी आणि एका वाहनाचा समावेश असणं अपेक्षित होतं. मात्र, तानाजी सावंतांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस दलातील तब्ब्ल ४८ पोलीस कर्मचारी आणि तीन वाहने नियुक्त करुन घेतली होती. सावंत यांचा उपयोग त्यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी, त्यांच्या घरासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी आणि ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचा ताफा नेणयासाठी करत होते. त्याचा ताण पुणे पोलीस दलावर पडत होता.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस दलावरील ताण कमी करत तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी कमी करण्याचा प्रयत्न करत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ४८ वरुन १५ वर आणली होती. तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेंमार्फत पोलीस आयुक्तांवर दबाव आणून पुन्हा पाहिल्याएवढेच पोलीस कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियुक्त करुन घेतले होते. आता तानाजी सावंत मंत्री नसल्यामुळे त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. सावंत यांना आता आमदार म्हणून केवळ एक सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे. आता तानाजी सावंत पुन्हा सुरक्षेत वाढ करून घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
-Pune GBS: पुण्यात जीबीएस आजाराच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या किती?
-शरद पवारांच्या ‘त्या’ आमदारानं घेतली अजित पवारांची भेट; नेमकं कारण काय?
-विधानसभेच्या पराभवाची धूळ झटकणार, राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात