पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्याशी युतीचे संकेत देत थेट युतीसाठी हात पुढे केला. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचे पहायला मिळाले. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपापली मते व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी देखील आमची भांडणं नाहीत, मी एकत्र यायला तयार आहे, असे वक्तव्य केले. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेनंतक आता परदेशी दौऱ्याची देखील तुफान चर्चा सुरु आहे.
सध्या उध्दव ठाकरे आणि कुटुंबिय युरोप दौऱ्यावर आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईत परतणार आहेत. तर राज ठाकरे देखील परदेशात गेले असून ते २९ एप्रिल रोजी मुंबईत परत येणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे. यावरुन देखील अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. मनसे आणि ठाकरेंची शिवसेनेच्या युतीबाबत परदेशात चर्चा होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, ठाकरे बंधू हे राजकीयदृष्ट्या एकत्र यावे अशी अनेक राजकीय नेत्यांसह महाराष्ट्रातील जतनेची देखील इच्छा आहे. राज-उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या चर्चेवर राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चा रंगतच होत्या. त्यातच आता ठाकरे बंधूंचा हा परदेश दौराही चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही महाराष्ट्रात परतल्यानंतर युतीबाबत नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
-‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अॅडमिशन फिक्स करा
-वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…
-पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; हर्षवर्धन सपकाळांकडे आणखी एक राजीनामा
-‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया