पुणे : पावसाळा सुरु झाला की अनेक जण पर्यटनाच्या ठिकाणी जात असतात. लोणावळ्यातील अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केले आहे. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवााई निश्चित होणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण- तरूणी पर्यटनासाठी येतात. रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहे. तसे आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आले आहेत, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-टिळेकर सुटले! हडपसरमध्ये अजितदादांच्या तुपेंना की शिंदेंच्या भानगिरेंना संधी?
-विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; योगेश टिळेकरांसह आणखी ४ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब
-संभाजी भिडेंचं ‘ते’ व्यक्तव्य अन् गिरीश महाजनांनी जोडले कोपऱ्यापासून हात, नेमकं काय घडलं?
-विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; २० जखमी, नेमका काय प्रकार?