पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. नराधम आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या वकिलांकडून कोर्टामध्ये करण्यात आलेल्या दाव्यात पिढीत तरुणी आणि गाडे यांच्यामध्ये सहमतीने शरीरसंबंध झाल्याचं सांगण्यात आलं. अत्याचारावेळी तरुणीने प्रतिकार केला नसल्याचा दावा देखील करण्यात आला, मात्र आता या सर्व दाव्यांना खोडून काढणारी माहिती पुढे आली आहे.
स्वारगेट एसटी स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या तरुणीने पोलिसांना दिलेला जबाब समोर आला आहे. आपण कंडक्टर असल्याच सांगत आरोपी गाडे तरुणीला शिवशाही बसमध्ये घेऊन गेला होता. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला आणि तरुणीचा गळा दाबला. तरुणीनं आरोपीकडे हात जोडून याचना करत तुला काय करायचे ते कर फक्त मला मारू नको, अशी विनंती केली.
दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती. तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं होतं. मुलीने प्रतिकार केला नसल्याच वक्तव्य खुद्द गृहराजमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र अत्याचारावेळी आरडाओरडा केल्याचा पीडितेनं जबाब दिला. शिवशाही बस एसी असल्याने तिला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महिला आयोगाची महत्वाची बैठक; चाकणकर काय म्हणाल्या?
-स्वारगेट अत्याचार: आरोपीच्या जाबाबातून धक्कादायक माहिती समोर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
-‘मी अत्याचार केला नाही, आमच्यात सहमतीने संबंध झाले’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा