कोल्हापूर : ‘शिवसेना ही सातत्याने महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी काम करत आली आहे. सध्या शिवसेनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने असल्याने महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत’ असे म्हणत शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. शिवसेनेचे दोन दिवसाचे महाअधिवेशन कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. यावेळी त्या महिला आणि युवा सक्षमीकरण या विषयावर बोलत होत्या. यावेळी शिवसेनानेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, युवासेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे महिलांसाठी काम करणारे सरकार आहे. महिलांना बसमध्ये अर्धे तिकिट, उच्च शिक्षणात मुलींना मोफत शिक्षण, नवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना सवलत, महिला बचतगट यांना विविध योजनांच्या मार्फत मदत उपलब्ध करुन त्यांना सक्षमीकरण करणे सातत्याने महिलांना न्याय मिळविण्याचे काम होताना दिसत आहेत, असं सांगत निलम गोऱ्हेंनी एकनाथ शिंदेंच्या कामाचे कौतुक केले आहे.
‘एकनाथ शिंदे हे कोणत्याही कामाला नकार देत नाहीत. पांढरे रेशनकार्ड धारक महिलांना देखील आनंदाचा शिधा देण्यासाठी सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची आठवण डॉ.गोऱ्हे यांनी करुन दिली. त्यामुळे श्री शिंदे हे खरे लोकांसाठी काम करणारे नेते असून हिंदूहृदयसम्राट यांचे खरे वारसदार आहेत’ असंही डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
या अधिवशनातून महिलांनी जात असताना ५ कलमी कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे काम सुरु करावे. या ५ कलमी कार्यक्रम हा महिलांची आणि अल्पवयीन मुलींची सुरक्षिता, आरोग्य सुरक्षिता, डीप क्लीन शहर (स्वछता), राष्ट्रहिताच्या मुद्दयांवर, स्थानिक नागरिक, कार्यकर्त्या, पदाधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष संवाद यावर काम करण्यासाठी वचनबद्ध होऊन येथून जायचे आहे असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं’; काकांनी सांगितला ‘भावनिक’ शब्दाचा अर्थ
-स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात
-भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर