पुणे : राज्यात एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पाऊले उचलली जात आहेत तर दुसरीकडे काहींना कायदा सुव्यवस्था तसेच महिलांच्या सुरक्षेचं काहीही पडलेलं नसून पदाचा गैरफायदा घेतला जात असल्याचं दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदावर असणाऱ्या एका पदाधिकाऱ्यावर आता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शंतनू कुकडेवर मदतीच्या नावाखाली मुलींवर अत्याचार करत असून जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना पत्र पाठवत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
पुण्याच्या समर्थ पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगिक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शंतनू कुकडेला अटक करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलींचे शोषण तसेच आर्थिक गैरव्यवहार याची पोलिस चौकशी करीत आहेत.
पुण्यातील कॅम्प परिसरात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजु मुलींचे शोषण तसेच आर्थिक व्यवहार झाल्याबाबतची बातमी प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून धर्मादाय आयुक्तांकडे या संस्थेची नोंदणी आहे किंवा नाही याबाबतही सत्यता पडताळून चौकशी करावी, पुणे पोलीसांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करत सखोल तपास करावा तसेच अल्पवयीन मुलीची सुरक्षितता तसेच समुपदेशनासाठी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारीच नाही, तीन महिन्यांपूर्वीच दिला होता राजीनामा
-‘लाडका दोस्त देशाचा लाडका…’; मुरलीधर मोहोळांचं भाषण ऐकून मित्राने केला कौतुकाचा वर्षाव
-शिंदेसेनेत जाताच धंगेकरांचे हिंदुत्व जागे, अजितदादांना म्हणाले “त्या पदाधिकाऱ्याला हाकला..”
-पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रशिक्षण